Tuesday, March 21, 2023

कृष्णा कारखाना निवडणूक : सत्ताधारी गटातून डाॅ. सुरेश भोसले आणि डाॅ. अतुल भोसले यांचे अर्ज दाखल

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकी साठी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल कडुन आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील निवडणुकीत ज्या अपेक्षेने सभासदांनी आम्हांला निवडुन दिले आहे, त्या अपेक्षांची पुर्ती सत्ताधारी संचालक मंडळाने केली.  निवडणुकासाठी हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे कृष्णा सहकारी साखर कारखान्यांचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले

- Advertisement -

डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्या ६ वर्षात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने अत्यंत चांगले काम केले आहे. आम्हांला सभासद मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास आहे. गेल्या सहा महिन्यात विरोधकांना अजूनही भूमिका निश्चित झालेली पहायला मिळत नाही. कृष्णा कारखान्यांचा कारभार चांगला चालला असल्याने विरोधकांकडे निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याने विरोधक गोंधळले आहेत. विकासकामांच्या अजेंडावर आम्ही निवडणुकीसाठी समोरे जाणार आहेत. 

कृष्णा कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या 1 जून हा अंतिम दिवस आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. कारखान्यांचे 47 हजार 700 सभासद आहेत. नविन संचालक मंडळाच्या निवडीसाठी 29 जुन रोजी मतदान होणार असुन 1 जुलै रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.