कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मर्या रेठरे बु या कारखान्याची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवार दि. 25 मे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करणेस सुरूवात झाली असून 1 जून पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. परंतु कोरोनाच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गर्दी करण्यास परवानगी नसल्याने केवळ सूचक किंवा उमेदवार यांच्यातील एकानेच निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले आहे.
कृष्णा कारखान्यांच्या निवडणुकासाठी आत्ता पर्यंत दि.25 मे रोजी 6, दि. 27 मे रोजी 26, व दि. 28 मे रोजी 84 असे एकूण 113 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करणेसाठी दि. 1 जून पर्यंत दुपारी 3 वाजे पर्यंत मुदत आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवार रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करणेसाठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्या कोविड 19 साथीच्या अनुषंगाने सर्व घटकांनी त्याबाबत शासन व जिल्हा दंडाधिकारी यांचे कडील आदेश ,निर्देश आणि मार्गदर्शक सूचना याचे पालन करणे आवश्यक व बंधनकारक आहे.
तेंव्हा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करू इच्छित सर्व उमेदवारांनी आपले परिपूर्ण भरलेले नामनिर्देशन पत्र दाखल करणेसाठी स्वतः किंवा त्यांचे सूचक यापैकी एकानेच निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल करणेसाठी फक्त उमेदवार स्वतः किंवा त्यांचे सूचकासच निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर व परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी व कोविड 19 संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर, आपापसात सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा व शासन व जिल्हा दंडाधिकारी यांचे कडील आदेशाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे.