Monday, March 20, 2023

कृष्णा कारखाना निवडणुक : शेवटच्या दिवशी 78 तर 21 जागांसाठी तब्बल 305 अर्ज दाखल

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 78 अर्ज दाखल झाले. कारखान्याच्या 21 जागासांठी आजपर्यंत तब्बल 305 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी आज बुधवार दि. 2 जून रोजी बाजार समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे.

- Advertisement -

आज दाखल झालेल्या अर्जांची गटनिहाय माहिती अशीरेठरे ब्रद्रुक-शेणोली गट ः सुरेश भोसले, अविनाश मोहिते (दोघेही रा. रेठरे बुद्रुक), संतोष जाधव (रा. रेठरे खुर्द), अधिकराव निकम, दिलीप सावंत, सुनिल सावंत (तिघेही रा. शेरे)

वडगाव हवेली-दुशेरे गट ः सुभाष लोकरे, सर्जेराव लोकरे (दोघेही रा. येरवळे), काकासो जगताप, अशोक जगताप (दोघेही रा. वडगाव हवेली), धोंडीराम जाधव, सुदाम जाधव (दोघही रा. दुशेरे), शिवाजी जगताप (रा. जुळेवाडी), कृष्णा जगताप, संभाजी मोरे, बापूसो मोरे, अक्षय पाटील (सर्व रा. कोडोली), भागवत कणसे (रा. विंग)

काले-कार्वे गट ः उदयसिंह पाटील (रा. आटके), अजित देसाई, उमा देसाई, विकास देसाई, नानासाहेब पाटील (सर्व रा. काले), अमरसिंह थोरात, संतोष पाटील (रा. कार्वे), नरेंद्रकुमार नांगरे-पाटील (रा. जखिणवाडी)

नेर्ले-तांबवे गट ः द्वारकोजी पाटील, अवधूत जाधव-पाटील, विक्रमसिंह पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा), वसंत पाटील, सुभाष पाटील, विश्‍वास पाटील (तिघेही रा. नेर्ले, ता. वाळवा), संभाजी पाटील (रा. वाठार), राहुल चव्हाण (रा. वाटेगाव, ता. वाळवा)

रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट ः भरत कदम (रा. भवानीनगर, ता. वाळवा), केदारनाथ शिंदे, सुभाष शिंदे, महेश पवार (तिघेही रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा), शिवाजी पवार (रा. उरूण, ता. वाळवा), संभाजी दमामे (रा. बहे), विश्‍वास पाटील, उदयसिंह शिंदे, मानाजी पाटील (तिघेही रा. बोरगाव, ता. वाळवा)

येडेमच्छिंद्र-वांगी गट ः नितीन शिंदे (रा. रामापूर, ता. कडेगाव), बाबासो शिंदे (रा. शिंदेमळा देवराष्ट्रे, ता. कडेगाव), शिवाजी पाटील, बाबासो पाटील, सुरेश पाटील (तिघेही रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा)

अनुसुचित जाती जमाती राखीव गट ः दिलीप बनसोडे (रा. गोंदी), नथुराम झिंगरे (रा. गोळेश्‍वर), शिवाजी आवळे (रा. शिरटे, ता. वाळवा), अनिल सावंत (रा. शेरे)

महिला राखीव गट ः इंदुमती झाकले (रा. नेर्ले, ता. वाळवा), मिनाक्षीदेवी दमामे (रा. बहे, ता. वाळवा), उमा देसाई (रा. काले), उज्जवला जगताप (रा. कोडोली), अनुराधा लोकरे (रा. येरवळे), किशोरी मोहिते (रा. बिचुद, ता. वाळवा), शुभांगी निकम (रा. शेरे), शोभा मोहिते (रा. बेलवडे बुद्रुक), नंदाताई जगताप (रा. वडगाव हवेली), स्नेहल शिंदे (रा. बोरगाव, ता. वाळवा), शैलजा पाटील (रा. कोडोली)

इतर मागास वर्ग राखीव गट ः कृष्णा माळी (रा. कासेगाव, ता. वाळवा), अमोल गुरव, संभाजी दमामे, संतोष दमामे (रा. बहे, ता. वाळवा)

विजा-भज-विमाप्र राखीव गट ः शंकर कारंडे (रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा), अमोल काकडे (रा. धोंडेवाडी)

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वडगाव हवेली-दुशेरे गटातील तीन जागांसाठी आजपर्यंत 51 अर्ज दाखल झाले आहेत. काले-कार्वे गटातील तीन जागासाठी 43 अर्ज, नेर्ले-तांबवे गटातील तीन जागासाठी 33 अर्ज, रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील तीन जागासाठी 50 अर्ज, येडेमच्छिंद्र-वांगी गटातील दोन जागांसाठी 24 अर्ज, रेठरे बुद्रुक-शेणोली गटातील दोन जागासाठी 30 अर्ज, महिला राखीव दोन जागांसाठी 33 अर्ज, अनुसूचित जाती-जमाती राखीव एक जागेसाठी 17 अर्ज, इतर मागास प्रवर्ग राखीव एक जागेसाठी 12 अर्ज, विजा-भज-विमाप्र राखीव एक जागेसाठी 12 असे एकूण 21 जागांसाठी 305 अर्ज दाखल झाले आहेत.