कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांचे अभद्र मनोमिलन केवळ पैशासाठी : डाॅ. सुरेश भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मनोमीलन करणं हे पूर्णपणे चुकीचे होतं, कारण गेल्या सहा वर्षात दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. एकमेकांच्या विचारांचे कोणत्याही प्रकारची सांगड नव्हती. मग यांचे मनोमिलन कसं होणार, आणि जरी हे अभद्र मनोमिलन झाला असतं तरी ते मनीमिलन (पैशासाठी) होतं असा आरोप सहकार पॅनेलचे प्रमुख सुरेश भोसले यांनी विरोधकांच्यावर केला.

रेठरे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. अतुल भोसले, पै. आनंदराव मोहिते, धनाजी पाटील यांच्यासह उमेदवार आणि सभासद उपस्थित होते.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/494294498493502

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखान्याच्या हितासाठी भविष्यात जे -जे चांगलं करायचा आहे, आणि जे मागील पाच वर्षात चांगले केले तोच अजेंडा घेऊन आम्ही सभासदांना समोरे जात आहोत. सभासदांचे आणि कामगारांचे आम्ही हित जपले आहे. यापुढील काळातही कारखाना अव्वल ठेवला जाणार आहे. त्यामुळे सभासद जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला चांगल्या मतांनी निवडून देतील.

मदनराव मोहिते म्हणाले, निवडणूक होण्या अगोदरच विरोधकांच्या वाटण्या चालू झाल्या आहेत. परंतु ज्यांना मनासारखे मिळाले त्यांनी मनोमिलनाला विरोध केला. सभासदांसाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका पाहिजे. दोन विरोधकांच्यात एकाने कारखाना लुबाडला, त्यामुळे आता कारखाना चांगला कसा चालला हे, सभासदांनी पाहिले आहे. मी केवळ सभासद आणि कारखान्याच्या हितासाठी सहकार पॅनेल सोबत आहे.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, विरोधकांच्याकडे कुठलाच मुद्दा नसून केवळ वैयक्तिक टिका टिप्पणी करण्याचे काम चालू आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीत अपप्रचार करत आहेत. रेठरे गावच्या कोणत्याच लोकांच्या हिताच्या संस्थेच वाटण्या होत नसतात. मग कृष्णा कारखान्यात हे वाटण्या स्वार्थासाठी करण्यासाठी निघाले. तेव्हा या स्वार्थी लोकांना सभासद 29 तारखेला त्यांची जागा दाखवतील.

Leave a Comment