Monday, February 6, 2023

श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला; काँग्रेस नेत्याच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिहाद ही संकल्पना फक्त इस्लाममध्ये नसून ती भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केले आहे. काँग्रेस नेत्या व माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्र पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यांनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

इस्लाम धर्मात जिहादची चर्चा खूप करण्यात आलेली आहे. जिहादचा मुद्दा तेव्हा येतो, जेव्हा मनात स्वच्छ विचार असताना देखील त्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करून देखील कोणी ते करत नाही किंवा तो ते समजत नाही, त्यावेळी म्हटले जाते की तुम्हाला जर शक्तीचा वापर करायचा असेल तर तो केला पाहिजे.. केवळ इस्लाम धर्मीय, कुराणच नव्हे, तर हिंदूंच्या गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातसुद्धा हेच सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद शिकवला आहे असं शिवराज पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, शिवराज पाटील यांच्या या विधानानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तोफ डागली आहे. शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्या राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला. त्या पक्षाच्या नेत्याकडून इतर काही अपेक्षा करु शकत नाही असं म्हणत मुस्लिम मतांसाठी अजून किती शेण खाणार असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.