KTM 390 Adventure X : KTM ने लाँच केली सर्वात स्वस्त टूरर बाइक; किंमत आणि फीचर्स पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्पोर्ट बाईक कंपनी KTM ने आपल्या साहसी रायडर्ससाठी नवी स्वस्त अशी एडवेंचर टूरर बाइक लाँच केली आहे. KTM 390 Adventure X या बाईकचे हे स्वस्त व्हर्जन कंपनीने 2.80 लाख रुपयांच्या किमतीत आणली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीच्या अॅडव्हेंचर बाईकचे हे सर्वात स्वस्त व्हर्जन आहे. बाजारात हि बाईक BMW G 310 GS ला थेट टक्कर देईल . चला आज आपण या दमदार बाईकचे खास फीचर्स पाहूया…

KTM 390 Adventure X

इंजिन –

सर्वप्रथम या गाडीच्या इंजिन बाबत सांगायचं झाल्यास, या बाइकला 373.37 सीसी सिंगल सिलेंडर 4-वाल्व्ह लिक्विड कूलिंग इंजिन आहे. हे इंजिन 9000 rpm वर 43.5 PS चा पॉवर आणि 7000 rpm वर 37 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या दमदार बाईकला 14.5-लिटर इंधन टाकी बसवण्यात आली आहे.

KTM 390 Adventure X

फीचर्स-

गाडीच्या फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास, KTM 390 Adventure X मध्ये फुल-LED लाइटिंग, ऑफ-रोड मोडसोबत ड्युअल-चॅनेल ABS, स्लिपर क्लच आणि 12-V USB सॉकेटसह अनेक फीचर्स आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह TFT डिस्प्ले काढला असून त्याऐवजी एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. ब्रेकिंगसाठी बाईकच्या पुढील चाकामध्ये 320 मिमी सिंगल डिस्क आणि मागील चाकामध्ये 230 मिमी सिंगल डिस्क देण्यात आला आहे. या गाडीला 200mm चा ग्राउंड क्लियरेंस मिळतोय.

KTM 390 Adventure X

किंमत किती ?

कंपनीने नवीन KTM 390 Adventure X या स्वस्त बाईकची किंमत 2.80 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवली आहे. बाजारात ही बाईक BMW G 310 GS, आणि KTM 250 Adventure या गाडयांना टक्कर देईल.