KTM Duke Price : KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली; पहा नव्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bike Lovers च्या मनातील आवडीची दुचाकी (KTM Duke Price) असलेल्या KTM च्या बाईकच्या किंमतीत कंपनीकडून वाढ करण्यात आली आहे. बजाज ऑटोने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत KTM DUKE बाइक्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर नवी KTM ची DUKE खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गाडयांच्या किमतीबद्दल जाणून घ्या…

किती रुपयांची झाली वाढ- 

KTM च्या (KTM Duke Price) दोन प्रसिद्ध बाइक Duke 200 आणि Duke 125 च्या किमती वाढल्या आहे. त्यानुसार Duke 200 हि गाडी खरेदी करण्यासाठी आपल्याला 1,472 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील तर दुसरीकडे Duke 125 बाईकची किंमत 1,728 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या नवीन किमती 5 मे पासून लागू झाल्या आहेत. दोन्ही बाईकची किंमत वाढली असली तरी बाइक्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

KTM Duke Price

काय असेल गाड्यांची नवी किंमत – (KTM Duke Price) 

KTM गाड्यांच्या (KTM Duke Price) किमतीत वाढ झाल्यानंतर KTM 200 Duke ची किंमत 1.88 लाख रुपयांवरून 1.90 लाख रुपये झाली आहे, तर 125 Duke ची किंमत 1.74 लाखांवरून 1.75 लाख रुपयांवर गेली आहे.

KTM Duke Price

Duke 200- Duke 125 ची वैशिष्ट्ये-

200 Duke ला 199cc, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते, जे 25.4bhp पॉवर आणि 19.5Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे Duke 125 ला 124.71cc, सिंगल-सिलेंडर, इंजिन आहे. जे 14.3bhp आणि 12Nm पीक टॉर्क बनवते. दोन्ही बाईक 6-स्पीड ट्रान्समिशनसह येतात.

हे पण वाचा : 

Bajaj CT 100 : किंमत एकुण तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 लिटर पेट्रोलमध्ये 90 कि.मी. जाते

FD Rates : आता ‘ही’सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा

Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे ‘ही’ऑफर

Ola Electric चा मोठा निर्णय!! तब्बल 1,441 स्कुटर परत मागवल्या; ‘हे’ आहे कारण

Whatsapp Features : व्हॉट्सअॅप आणणार 3 दमदार फीचर्स; Movies सुद्धा शेअर करता येणार

Leave a Comment