Whatsapp Features : व्हॉट्सअॅप आणणार 3 दमदार फीचर्स; Movies सुद्धा शेअर करता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | WhatsApp हे सोशल मीडिया वरील प्रसिद्ध अँप (Whatsapp Features) म्हणून ओळखलं जात. वेगवेगळे फोटो- व्हिडिओ शेअर करण्यासाठी, आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी बोलण्यासाठी आपण व्हाट्सअप चा वापर करतो. आता आपल्या वापरकर्त्यांना WhatsApp वर अनेक सोयी सुविधा मिळाव्या यासाठी कंपनी काही नवे फीचर्स आणत आहे. यामध्ये ग्रुप मधील सदस्य संख्या, व्हिडिओ किंवा एखादी फाईल शेअरिंग तसेच इमोजी यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हाट्सअप च्या या नवीन वैशिष्ट्यांमध्ये काय खास आहे आणि ते तुमच्या WhatsApp वापरण्याचा अनुभव कसा बदलणार आहेत.

आता 500 हून अधिक सदस्यांना ग्रुपमध्ये अॅड करता येणार-

व्हॉट्सअॅपचे हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे एकाच ग्रुप यामध्ये आपण 512 सदस्यांना add करू शकतो. आत्तापर्यंत आपण एकाच ग्रुपमध्ये फक्त 256 लोकांना add करू शकत होतो. आता हि सदस्य संख्या वाढली असून एकाच वेळी आपण अनेक लोकांशी संपर्क करू शकतो. हे फीचर iOS प्लॅटफॉर्मवर दिसले होते. मात्र लवकरच Android बीटा वापरकर्त्यांसाठी देखील रिलीज केले जाईल.

Whatsapp Features

Whatsapp इमोजी Reaction – (Whatsapp Features)

Whatsapp इमोजी Reaction हे फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. नवीन इमोजीमध्ये , तुम्हाला प्रेम, स्माईल, आश्चर्य, दुःख आणि चॅट्सचे आभार असे पर्याय मिळतील. येत्या अपडेटमध्ये कंपनी कलर टोन आणि इमोजींची संख्या वाढवणार आहे. वापरकर्ते कोणताही संदेश जास्त वेळ दाबून इमोजी पर्यायात प्रवेश करू शकतात आणि वापरू शकतात. हे नवीन फीचर (Whatsapp Features) हळूहळू सर्व युजर्सपर्यंत पोहोचेल.

Whatsapp Features

मोठ्या साईजचे फोटो-व्हिडीओ पाठवता येतील-

नवीन अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सला 2 GB पर्यंतच्या फाईल्स शेअर करण्याचा पर्याय देणार आहे. कंपनी या फीचरवर (Whatsapp Features) बराच काळ काम करत होती. कंपनी लवकरच हे फीचर आणणार आहे. या फीचर आल्यानंतर यूजर्स त्यांच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह हाय -रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ सहजपणे शेअर करू शकतील.

हे पण वाचा : 

Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

EPF Account पॅन नंबरशी लिंक करा नाहीतर भरावा लागेल दुप्पट TDS

BSNL चा धमाकेदार प्लॅन: Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime Free सब्सक्रिप्शन

 

Leave a Comment