हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं. कुलदीप यादवने ५ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडं मोडलं आहे. यावेळी कुलदीपने (Kuldeep Yadav) एक असा भन्नाट चेंडू टाकला की तो कोणालाच समजला नाही. कारण हा चेंडू १०.९ डीग्रीमध्ये वळला आणि समोरच्या फलंदाजांची दांडी गुल झाली. याबाबतचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
हि गोष्ट आहे इंग्लंडच्या डावाच्या ३८ व्या षटकातील… समोर होता सलामीवीर झॅक क्रोवले .. अतिशय आक्रमक खेळत क्रोवलेने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. मात्र ३८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीपने क्रोवलेला मामा बनवलं.. कुलदीपच्या चेंडूंवर मोठा फटका मारण्यासाठी क्रोवले पुढे सरसावला, मात्र चेंडू इतका वळला कि तो थेट स्टम्पवर आदळल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू ज्या पद्धतीने वळला तो कोणालाच कळला नाही. हा चेंडू १०.९ डिग्रीमध्ये वळल्याचे त्यानंतर दाखवण्यात आले. कुलदीपचं हा चेंडू बॉल ऑफ द ईयर ठरू शकतो.
THAT KULDEEP YADAV DELIVERY TO FOX ZAK CRAWLEY TURNED 10.9°…!!! 🤯🔥 pic.twitter.com/PlBscglpiz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2024
दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २१८ वर आटोपला. सलामीवीर झॅक क्रोवलेने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून कुलदीप यादवने ५ बळी घेतले. तर आपला १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या. याशिवाय जडेजाने १ बळी घेतला. भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडने अक्षरशः गुडघे टेकले.