किरकोळ कारणावरून पैठण येथे कुल्फी विक्रेत्याचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पैठण | क्षुल्लक कारणावरून नेहमी होत असलेला वाद विकोपाला जाऊन शेजारी असलेल्या एका हातगाडीवर कुल्फी विकणाऱ्या अण्णाचा हतोडीने वार करून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. आरोपीला गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली आहे.

गेस्ट हाऊस रोड वरील फकीर वाडा भागात मयत परप्रांतीय कुल्फी विक्रेता मायाशंकर प्रजापती (वय 45) हा अनेक वर्षांपासून राहतो. त्याठिकाणी त्याने त्याचे स्वतःचे घर घेतले आहे. हातगाडीवर कुल्फी विकून तो आपल्या परिवाराची उपजीविका भागवतो. त्याचा आणि शेजारी असलेल्या करीम शहा (वय 35 ) यांच्यात नेहमी छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असतो. हा वाद रविवारी विकोपाला गेला.

प्रजापती हे सकाळी कुल्फीची हातगाडी काढत असतांना त्याच्या चेहऱ्यावर करीम याने हतोडीने वार केला ज्यात प्रजापती हे गंभीर जखमी झाले. प्रजापतीला यांना तेथील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी अगोदर पैठण व नंतर औरंगाबादला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. दरम्यान, सदर घटनेतील आरोपी करीम शहाला पैठण पोलिसांनी अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीला शहागडला जाऊन त्याच्या हातात बेड्या ठोकल्या.