हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kumar Shahani) सिनेजगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथाकार कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. तर कला जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. कुमार साहनी यांनी ‘माया दर्पण’ आणि ‘कसबा’ यांसारख्या विविध धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांमुळे साहनी प्रचंड चर्चेत आले होते.
कुमार साहनी यांच्या निधनाने सिने जगताचे मोठे नुकसान झाले आहे. (Kumar Shahani) एका वृत्तानुसार, गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुमार साहनी यांच्या तब्येतीची कुरबुर सुरु होती. दरम्यान अचानक त्यांची तब्येत खालावली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कुमार साहनी हे केवळ दिग्दर्शक नव्हते. तर ते एक प्रख्यात शिक्षक आणि पटकथाकार म्हणून देखील कार्यरत होते. त्यांनी आपल्या दमदार लेखणीच्या जोरावर सिने जगतात आपले विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांनी स्वतःची विशेष लोकप्रियता मिळवली होती. यामुळे आज त्यांच्या निधनामूळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
(Kumar Shahani)कुमार साहनी यांच्या निधनाचा बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी साहनी यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. साहनी यांनी ‘माया दर्पण’, ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’ आणि ‘कसबा’ यासारख्या दर्जेदार कलाकृती सिने जगताला दिल्या आहेत. यामुळे त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग होता. लरकाना शहरात जन्म झालेल्या सहानी यांनी उद्योगधंद्यासाठी मुंबईत पाऊल ठेवले. मात्र या शहराने त्यांना एक वेगळीच ओळख दिली.
कुमार साहनी यांनी पुण्यातील एफटीआय इन्स्टियुटमधून दिग्दर्शनाचे धडे गिरवले होते. यानंतर त्यांनी फ्रान्समधूनही दिग्दर्शन क्षेत्रात आणखी प्राविण्य मिळवले. पुढे निर्मल वर्मा यांच्या ‘माया दर्पण’ नावाच्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. या चित्रपटासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट’ हा पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ आणि ‘चार अध्याय’ या चित्रपटांनासुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. (Kumar Shahani)