कुंभारगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट : ग्रामपंचायत व कोरोना कमिटीच्या निर्णयांचे उल्लघंन करणाऱ्या विरोधात पोलिसांत तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील कुंभारगाव गाव सध्या कोरोनाचे हॉस्पॉट बनले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला तर कोरोनाने 9 ते 10 जणांचा बळी घेतला ही दुर्दैवी बाब आहे. कुंभारगाव ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत व कोरोना कमिटीची मिटींग घेवून 10 जुलै रोजी कोरोनाला रोखण्यासाठी एक मताने आठवडाभराचा जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही केली सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी या नियमांचे उल्लघंन केले आहे, अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कुंभारगाव येथे सर्वत्र कोरोना संसर्गाचे फलक लावले होते, मात्र 4 दिवसात काही बेफिकीर नागरिकांनी बंदिस्त केलेले रस्त्याचे कुंपण तोडून रस्ते मोकळे केले. त्यावरील कोरोना संसर्गाचे फलकही रस्त्याच्या कडेला फेकून दिले. कोरोना संसर्ग वाढण्यासाठीच जणू रस्ता मोकळा केला की काय ? या घटनेवर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा अशा बेजबाबदार नागरिकांना शोधून काढून कारवाई करण्याची प्रशासनाकडे मागणी केली केली आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक अनिल जाधव, पोलीस पाटील अमित शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीत कोरोना कमिटी सदस्य यांनी तातडीने बंदिस्त रस्त्याचे कुंपण तोडणाऱ्या व ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना शासन व्हावे, म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञाता विरुद्ध ढेबेवाडी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी, मागणी केली आहे.