प्रतापगड साखर कारखाना निवडणुकीत कुसुम गिरी व बाळकृष्ण निकम विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. कारण तालुक्यातील सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. 21 जागांपैकी तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आल्यानंतर उरलेल्या 18 जागांसाठी काल 13 मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले. उर्वरित जागांसाठी आज मतमोजणी केली जात असून कुसुम लक्ष्मण गिरी या दुसऱ्या फेरीत 2077 मतांनी विजयी झाल्या. तर संस्थापक सहकार पॅनलमधील बाळकृष्ण निकम 1282 मताने विजयी झाले.

सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूतिच्या उर्वरित 18 जागांसाठी आज सकाळी मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. हळू हळू या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. दरम्यान, नुकताच दोन उमेदवाराचा निकाल हाती आला असून त्यामध्ये कुसुम लक्ष्मण गिरी आणि बाळकृष्ण निकम हे विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी या ठिकाणी संस्थापक सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व विरोधात बचाव पॅनेलचे प्रमुख दीपक पवार यांच्या गटात सरळसरळ लढत होत आहे. आतापर्यंत 21 जागांपैकी तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आले आहेत. सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व बचाव पॅनेलचे प्रमुख दीपक पवार यांच्या गटात आता सरळसरळ लढत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.

Leave a Comment