कुसूर ग्रामपंचायत : कदम, मोरे, देशमुख यांची 10 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता; उदयसिंह कदम सरपंच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कुसूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह ऐतिहासिक विजय प्राप्त करत 10 पैकी 10 जागी विजय मिळवला आहे. उदयसिंह आनंदराव कदय यांना सरपंचपदासाठी बहुमत प्राप्त झाले आहे. कदम, मोरे, देशमुख यांच्या गटाने खाडे-पाटील गटाचा दारुन पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम (मुकादम तात्या) यांचे नातू उदयसिंह कदम यांना सरपंच पदी बहुमत मिळाल्याने गावाला आता तरुण नेतृत्व मिळाल्याने एकच जल्लोष सुरु आहे.

पश्चिम सुपनेत गड आला पण सिह गेला; अवघ्या दोन मतांनी सरपंच विजयी

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमत एका गटाला तर सरपंच पद दुसऱ्या गटाला मिळाले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचा दारुन पराभव करत शेतकरी ग्रामविकास पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले आणि उदयसिंह उंडाळकर गट एकत्र पाहायला मिळाले. पृथ्वीराज बाबा यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते यांनी कदम, मोरे, देशमुख यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने शेतकरी ग्रामविकास पॅनल १०-० ने विजयी झाले आहे. मागील पाच वर्षांमधील अकार्यक्षम नेतृत्वामुळे यंदा कुसूर ग्रामस्थांनी ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलला भोपळा देत एकही जागा निवडून दिलेली नाही. 10 पैकी 10 जागी विजयी मिळवत शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.

आटकेत तब्बल 30 वर्षांनी सत्तांतर; सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलचा 8 जागांवर विजय

कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकरता शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण पहायला मिळाले. गेल्या निवडणुकीत 9 जागापैकी भोसले – उंडाळकर 6 तर बाबा गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. परंतु लोकनियुक्त सरपंच पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने बाजी मारली होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचा पराभव

कुसूर येथे शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व विकास अधिकराव कदम, संभाजी हिंदुराव देशमुख यांनी केले होते. तर जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व सतिश विश्वासराव पाटील हे करत होते. लोकनियुक्त सरपंच आपल्याच गटाचा व्हावा, याकरिता दोन्ही गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र आजवर गावाच्या विकासातील योगदानामुळे मतदारांनी यंदा कदम, देशमुख, मोरे गटाला एकहाती सत्ता दिली आहे.