Monday, January 30, 2023

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचा पराभव

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील उमेदवाराचा पराभव झाला आहे.

- Advertisement -

कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटीची निवडणूक पार पडली आहे. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील उमेदवाराचा पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.

कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजप अशा पक्षातील उमेदवार निवडून येत आहेत. अनेक गावामध्ये सत्तांतर घडल्याचे पहायला मिळत आहे.