स्टॉक मार्केट ट्रेडिंगसाठी आता KYC अनिवार्य; अंतिम मुदत इथे तपासा

Stock Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता तुम्हाला तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे KYC करावे लागेल. अन्यथा, तुमचे खाते बंद केले जाईल आणि तुम्ही शेअर बाजारात ट्रेड करू शकणार नाही.

1 जून 2021 नंतर उघडलेल्या सर्व खात्यांसाठी सहा डिटेल्स देणे अनिवार्य करण्यात आले आहे. KYC अपडेट करण्यासाठी गुंतवणूकदारांना 31 मार्च 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही माहिती अपडेट न केल्यास तुमचे डीमॅट खाते इनऍक्टिव्ह केले जाईल. त्यानंतर ही माहिती अपडेट केल्यानंतरच ती पुन्हा ऍक्टिव्ह होईल.

KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी ?
NSDL नुसार, डीमॅट आणि ट्रेडिंग खाती असणार्‍या गुंतवणूकदारांनी तुमच्या KYC प्रक्रियेचे 6 डिटेल्स देणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, पत्ता, पॅन डिटेल्स , मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि वार्षिक उत्पन्न यांचा समावेश आहे. डिमॅट खातेधारकाने उत्पन्न, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी अपडेट न केल्यास त्याचे खाते इनऍक्टिव्ह केले जाईल.

खात्यात असलेल्या शेअर्सचे काय होणार?
खाते इनऍक्टिव्ह केल्यावर, सध्याचे शेअर्स किंवा पोर्टफोलिओ खात्यातच राहतील. मात्र, तुम्ही कोणत्याही नवीन प्रकारची खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. KYC डिटेल्स अपडेट केल्यावरच हे खाते पुन्हा ऍक्टिव्ह केले जाईल. सीडीएसएल आणि एनडीएसएल ने यापूर्वीच यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.शेअर बाजाराचे काम पारदर्शक व्हावे आणि शेअर होल्डिंगची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी KYC वर भर देण्यात येत आहे. KYC सह, सेबीकडे शेअर खरेदी आणि विक्रीचे संपूर्ण खाते असेल. यामुळे करचुकवेगिरीलाही आळा बसेल.