सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात रोज ८०० पेशेंट पाॅझिटीव्ह येत आहेत. तपासणीचा रिपोर्ट देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात २ हजार ९८४ बेड आहेत. त्यापैकी आयसीयू व्हेटींलेटर १९३, आॅक्सिजन ३००, विना आॅक्सिजन १ हजार ७९६, विना आे टू ६९४ अशी बेडची संख्या आहे. जिल्हा कोविड सेंटरमधील व्हेटींलेटर बेड भरलेले आहे. जिल्ह्यात आयसीयू व्हेटीलेटर बेडची कमतरता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात कोरोना व्हायरसची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. चव्हाण यांनी माहिती दिली. डाॅ. सुभाष चव्हाण म्हणाले,जिल्ह्यात खासगी व शासकीय दवाखान्यात १११ आयसीयूमध्ये व्हेटींलेटरवर पेशंट आहेत. तर विना अोटू १६६ पेशंट आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. आॅक्सिजनवरती ८९१ पेशंट असून विना अोटू २७७ पेशंट उपचार घेत आहेत. आता बेडचा विचार केला तर १ हजार ३९५ बेड शिल्लक आहेत. आयसीयू बेडची कमतरता आहे. जिल्हा प्रशासन आयसीयू बेडची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आता जिल्ह्यात ६६ आयसीयू बेड तर ११० अोटू बेड तयार करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्याचा प्रस्ताव कलेक्टर यांनी राज्यशासनाला पाठवलेला आहे. सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये १५ बेड नविन करण्याचे प्रस्तावित आहे. जम्बो हाॅस्पिटलला २० आयसीयू बेड करण्याचा प्रयत्न करतोय. जिल्हा क्रिडा संकुलात बॅंडमिटन हाॅलमध्ये ८० बेड नविन आॅक्सिजनची पाईपलाईन टाकून तयार करत आहोत. काशिळ येथील ग्रामीण रूग्णालयात ६६ बेड प्रस्तावित आहेत. त्यामध्ये ३१ बेड आयसीयू तर ३२ आॅक्सिजनचे असतील. आॅक्सिजन आणि नाॅन आक्सिजन बेडची कमतरता नाही. कमतरता आहे ती,आयसीयू व्हेटीलेटर बेडची आहे. जिल्हा कोविड सेंटरमध्ये व्हेटींलेटर बेड भरलेले आहे. लोकांनी १०७७ शी संपर्क करावा. बेड उपलब्ध असेल तरच पेशंट पाठवावा, असे आवाहन डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा