रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीमध्ये एक विदारक परिस्थिती समोर आली आहे. यामध्ये गावात रस्ता नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर (senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment) पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकीकडे देश प्रगती करत तर दुसरीकडे काही गावे मूलभूत सुविंधाअभावी दुर्लक्षित आहेत. हे या व्हिडिओवरून दिसत आहे.
कोकणात विदारक परिस्थिती ! रस्त्याअभावी आजारी वृद्धेला तब्बल पाच किलोमीटर डोलीतून नेले pic.twitter.com/Q1PZhTi6Q3
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 5, 2022
काय आहे नेमके प्रकरण?
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मीर्ले-खोपी या धनगरवाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार (senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment) समोर आला आहे. रस्ताच नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील (senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment) ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. ठमाबाई बाबा माने असे या 90 वर्षांच्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
खेड तालुक्यातील या धनगर वाडीमध्ये ही घटना घडली. मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावरती दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये (senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment) ही वाडी वसली आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षातही या वाडीत जाण्यासाठी साधा रस्तादेखील बनवण्यात आला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या गावात जाण्यासाठी पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. मात्र, निधीअभावी हा रखडला असल्यामुळे रस्ता बनू शकला नाही.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???