धक्कादायक! गलवान संघर्षात चिनी सैन्याने धारदार शस्त्रांनी भारतीय जवानांवर केला होता वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लष्करातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली १५-१६ जूनच्या रात्री चीनच्या सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी दोन्ही सैन्यात अतिशय हिंसक स्वरूपाची ही झडप झाली होती. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार या संघर्षामध्ये भारतीय जवानांना बऱ्याच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही तास चाललेल्या या संघर्षामध्ये पाण्यात बुडण्यामुळं, अती थंडीमुळं जवानांना बऱ्याच जखमा झाल्याचं उघडल झालं आहे. लेहमधील सोनम नरबू मेमोरियल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरांनी गोपनीयतेच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला महत्त्वाची माहिती दिली. शहीद जवानांचे मृतदेह पाहता त्यावरील जखमा संघर्ष किती मोठा आणि हिंसक स्वरुपाचा होता याची प्रचिती देतात असं सांगितलं. धारदार शस्त्राचे वार आणि बरगड्यांना लागलेला मार पाहता बहुतांश जवानांची हीच परिस्थिती पाहायला मिळाल्याचंही त्यांनी उघड केलं.

चिनी सैनिकांचे हे वार झेलत भारतीय सैनिकांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं हेसुद्धा अधोरेखित करण्याजोगं. भारतीय सैन्यातील कमांडींग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केल्यानंतर भारतील जवानांनी चीनच्या तुकडीवर सबळ हल्ला चढवला अशी माहिती एका जखमी भारतीय जवानानं दिली होती. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यात झालेल्या या संघर्षानंतर जवळपास १८ जवानांना लेहमधील रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. कर, उर्वरित ४० जवानांवर सैन्याच्या इतर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. असं असलं तरीही अद्यापही सैन्याकडून मात्र या आकडेवारीबद्दल काहीच स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”