हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य करण्यावर भर देत आहे. सध्या या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. म्हणजेच या डिसेंबर महिन्यापर्यंत सहा हफ्ते सरकारने महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. परंतु अशातच सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी चाळणी लावली आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता इतर सर्वच अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची नावे या योजनेच्या लिस्टमधून कमी होतील.
महत्वाचे म्हणजे या योजनेबाबत वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे योजनेसाठी जमा करण्यात आलेल्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. या पडताळणीमध्ये अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती आढळली तर ते अर्ज फेटाळले जाणार आहेत. म्हणजेच अनेक महिलांना या योजनेचे पैसे येणे बंद होतील.
दरम्यान, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन, शासकीय नोकरी, सरकारी योजनेचा लाभ, ऑनलाइन ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे, अशा कित्येक कारणांमुळे महिलांचे अर्ज बाद होणार आहेत.