हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना (Ladki bahin yojana) 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेत्यांनी जाहीर सभेत याबाबत आश्वासन सुद्धा दिले होते, परंतु आता सरकार येऊन ५-६ महिने बहिणींना २१०० रुपये काही मिळाले नाहीत… उलट आहे तो १५०० रुपयाचा हप्ताही वेळेवर मिळेना झालाय…. 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार याकडे महिला वर्गाची उत्सुकता लागली आहे… मात्र १५०० रुपयांचे २१०० होणे शक्य नाही अशी कबुली सरकार मधील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे… शिरसाट यांच्या कबुलीमुळे सरकारने महिलांना फसवलं तर नाही ना अशा चर्चा सुरु आहेत.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे. लाडकी बहिण योजनेत 1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
लाडक्या बहीण बाबत मला फेब्रुवारी मधे फाईल आली होती त्यावेळी मी स्पष्टपणे पैसे देत येणार नाही अस लिहिलं होतं. लाडक्या बहीण योजनेचे सरकारवर बर्डन आहे. अजित पवार जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही. त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी चुकीच ब्रीफ करत असणार, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, लाडकी बहिण योजनेमुळे सरकार आलं. त्यावर आक्षेप घेण्याच कारण नाही. या पद्धतीने पैसे कमी करु नका. इतर अनेक मार्ग आहेत. “ही योजना बंद होऊ नये. पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची धारणा आहे असेही शिरसाट यांनी म्हंटल. दरम्यान, संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून येते.