लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड; भाजपची कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला खुश करण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आल्याचा आरोप एकीकडे विरोधक करत असताना आता खुद्द भाजप आमदाराने सुद्धा असच काहीसे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे आम्ही मतांसाठी केलेला जुगाड आहे असं भाजपचे आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) यांनी म्हंटल आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबतचा व्हिडिओ सुद्धा ट्विटर हॅन्डल वर शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओत?

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना टेकचंद सावरकर म्हणाले, आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली? इमानदारीने सांगा कशासाठी केलं? अंत:करणाने सांगा बरं हे का केलं? कारण जेव्हा तुमच्या घरासमोर निवडणुकीची मतदानाची पेटी येईल. तेव्हा माझ्या या लाडक्या बहीणी कमळाला मत देतील, यासाठी तर हा जुगाड केला आपण,” असं आमदार सावरकर भाषणात म्हणतात. तसेच पुढे बोलताना, “इतर लोक खोटं बोलत असतील पण मी खरं बोलतोय. माझं म्हणणं खरं आहे का नाही सांगा?” नाहीतर लायचं एक आणि करायचं एक असे प्रकार करायला आम्ही काय रामदेव बाबाचे कार्यकर्ते आहोत का? असा सवालही टेकचंद सावरकर यांनी केला. हाच विडिओ वडेट्टीवार यांनी शेअर करत महायुती सरकारवर घणाघात केला आहे.

अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. जे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या डोक्यात होतं तेच या आमदाराच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.