उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचे निलंबन (suspension) अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन (suspension) मागे घेतले आहे. मंगल गिरी यांनी डुयटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवल्यामुळे त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी मंगल गिरी यांच्याबरोबर वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांनासुद्धा निलंबित (suspension) करण्यात आले होते.
यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी एसटी महामंडळाने केलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला होता. अखेर त्यांची चौकशी करून एसटी महामंडळाने हे निलंबन (suspension) मागे घेतलं आहे. मंगल गिरी या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. आपल्या रिल्सच्या माध्यमातून त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर 1 ऑक्टोबर रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यानंतर ST मंडळाने आपल्या निर्णयाचा फेरविचार केला आणि दोन ओळींचं पत्र लिहित मंगला गिरी आणि कल्याण कुंभार यांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती दिली. ST महामंडळावरील वाढत्या दबावामुळे हे निलंबन (suspension) मागे घेण्यात आले.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!