Lagna Kallol : नवरीच्या पत्रिकेत सापडणार घोळ, थिएटरमध्ये गाजणार ‘लग्नकल्लोळ’; धमाकेदार ट्रेलर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lagna Kallol) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा अखेर धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित हा चित्रपट मल्टिस्टारर असून लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. अशातच ट्रेलर रिलीजनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे.

लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. (Lagna Kallol) यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला १ मार्चला मिळणार आहे. हा एक रॅामकॅाम चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला मयुरी आणि सिद्धार्थचं लग्न होताना दिसतंय. त्यात पुढे मयुरी आणि भूषण एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. (Lagna Kallol) इतकंच काय तर त्यांच्या लग्नाचा बार उडवायला सगळे तयार आहेत. पुढे समजतंय की, ही गोष्ट जुळ्या बहिणींची आहे. ज्यांच्या पत्रिकेत अगदी सेम टू सेम योग आहेत. ज्यामुळे सगळे टेन्शनमध्ये येतात. पण आता हा पत्रिकेतील योग नक्की काय आहे? यामुळे नेमका काय घोळ होणार आणि काय ड्रामा रंगणार? हे पाहण्यासाठी थिएटरमध्ये ‘लग्नकल्लोळ’ पाहिला पाहिजे. तरच उत्तरं मिळतील.

(Lagna Kallol) या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ‘कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी, हे आधीपासूनच मनात होते. त्यातूनच ‘लग्नकल्लोळ’ची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली. (Lagna Kallol) कलाकार, दिग्दर्शक, लेखक, संगीत, तांत्रिक बाबी या सगळ्यासाठी माझ्यासोबत इंडस्ट्रीतील नामंवत मंडळी जोडली गेली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा रॅामकॅाम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल. सोबतच यात भावनाही आहेत’.