खाऊगल्ली | थंडीच्या दिवसांत भूक लागणे स्वाभाविक आहे. पण रोजरोज पोळी भाजी खाण्यापेक्षा वेगळ काहीतरी खायला सर्वांना नक्की आवडेल. याचसाठी नवीन आणि रुचकर असा हा पदार्थ खास तुमच्यासाठी जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आवडेल.
साहित्य –
१) भोपळ्याचा किस २ वाट्या
२) गुल २ वाट्या
३) तूप ३ चमचे
४) गव्हाचे पीठ २ वाट्या
५) तेल ( भाजण्यासाठी )
कृती –
प्रथम भोपळ्याचा किस करावा. कुकर मध्ये तूप टाकूनभोपळ्याचा किस भाजून त्यात गुळ घालून मिश्रण शिजवूनघ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ मिसळावे. नंतर या कणकीचे गोळे करून घ्यावे. पोळपाटावर सुतीकापड ठेऊन त्या कापडावर केलेले गोळे थापून घ्यावे. तावगरम झाल्यावर तव्याला तेल लावावे व कापडावर थापलेलेघारे कापड सहित तव्यावर टाळावे वरून कापड कडून घ्यावे. घारे दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्यावे. अश्याच प्रकारेसर्व गोळ्यांचे घारे करून घ्यावे.
हे घारे आपण दूध सोबत खाऊ शकतो.
(टीप – या पिठाच्या पुऱ्या देखील करू शकतो. पण जास्त तेलकट खाण्या पेक्षा कापवार थापलेल्या घाऱ्या छानच.)
लहान मुले भोपळा खात नसल्याने असा पदार्थ ते नक्की खातील.




