Lalbaugcha Raja 2022: ‘हि’ शान कोणाची..?; लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा थाटात संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई| (Lalbaugcha Raja 2022) गेल्या २ वर्षात कोरोनाच्या महामारीने अक्षरशः सळो का पळो करून सोडले आहे. अशातच पर्यटन, सार्वजनिक स्थळे, मनोरंजन, सण- उत्सव अशा सगळ्यांवरच बंदी आली. दरम्यान अत्यंत उत्साहदायी असा सार्वजनिक गणेशउत्सव असो किंवा गोपाळ काळा यासारख्या मोठ्या सणांवर महामारीने आपली काळी छाया टाकली. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या चौकटीत गतवर्षी कसेबसे उत्सव साजरे झाले मात्र तो उत्साह तो आनंद कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं जाणवला. यानंतर यंदा कोरोनाची तीव्रता कमी झाल्याचे निदर्शनास येताच शासनाने नियमांचे बंधन दूर केले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव एकदम जोरदार होणार. नुकताच मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित असणाऱ्या लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे पाद्यपूजन आणि गणेश मुहूर्त पूजन पार पडले आहे.

https://www.instagram.com/p/CeqCzPggIPf/?utm_source=ig_web_copy_link

 

मुंबईत अत्यंत उत्साहाने लालबाग परळ या भागात गणेशोत्सव साजरा केला जातो. या भागात अनेक गणेश मंडळे विविध सजावटी, देखावे आणि आरास करून बाप्पाचे १० दिवस मनोभावे पूजन आणि सेवा करतात. या संपूर्ण भागातील अत्यंत मानाचा आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. (Lalbaugcha Raja 2022) लालबागच्या राजाचे केवळ मुखदर्शन व्हावे यासाठी भाविक फार मोठे अंतर पार करून येत असतात.

https://www.facebook.com/LalbaugchaRaja/videos/297509179168469

आंध्रा, पंजाब, तेलंगणा आणि इतर अनेक विविध राज्यातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. गेल्या २ वर्षात महामारीचे संकट इतके भयंकर होते कि अनेक भाविकांना आपल्या बाप्पाचे दर्शन घेण्याचे सुख मिळाले नाही. केवळ ऑनलाईन दर्शन घेण्यातच धन्यता मानावी लागली. मात्र यंदा हा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यंदा सर्व काही पूर्ववत होईल अशी आशा आहे.

Lalbaugcha Raja 2022

यंदा लालबागच्या राजाचे ८९ वे वर्ष आहे. आज दिनांक ११ जून २०२२ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन संपन्न झाले. (Lalbaugcha Raja 2022) हनुमान मंदिर, लालबागचा राजा मार्ग, श्री गणेश नगर, लालबाग, मुंबई येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कांबळे आणि त्यांच्या पत्नी यांच्या सुहस्ते बाप्पाचे पाद्यपूजन करण्यात आले.

https://www.instagram.com/reel/CeoJPwkAl-Z/?utm_source=ig_web_copy_link

तर खजिनदार श्री मंगेश दळवी यांच्या सुहस्ते वहीपूजन संपन्न झाले. दरम्यान मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्यासह इतर मुख्य कार्यकारिणी सदस्य, सेवेकरी आणि बाप्पाच्या भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी बाप्पाकडे सर्वांनी मिळून, महामारीपासून सर्वांचे रक्षण कर आणि सर्वाना चांगले आरोग्य लाभुदे असे साकडे घालण्यात आले. (Lalbaugcha Raja 2022)

 

Leave a Comment