मुंबई प्रतिनिधी | लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याचं लोण मुंबईपर्यंत पसरलं आणि त्याचीच परिणीती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली.
लालबागच्या राजाची ही मनोहारी मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे. लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस या मार्गावरून ही मिरवणूक वाजतगाजत गिरगाव चौपाटी येथे पोहोचते.