हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील ही चौकशी 2021 साली बंद करण्यात आली होती. पण, आता सीबीआयकडून लालू प्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगी चंदा यादव आणि रागिणी यादव यांचीही चौकशी केली जाणार आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या केल्या जाणाऱ्या चौकशीवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाटणा येथे त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “बघताय ना तुम्ही काय होत आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
आज लालू प्रसाद यादव यांच्याश त्यांच्या कुटुंबीयांची ज्या प्रकरणावरून चौकशी केली जाणार आहे. ते प्रकरण नेमकं काय आहे? असा अनेकांना प्रश्न पडला असेल तर संयुक्त पुरोगामी आघाडीचे ( युपीए ) सरकार सत्तेत असताना लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. तेव्हा मुंबईतील वांद्रे येथील रेल्वेची जमीन भाडेपट्ट्याने आणि दिल्लीतील रेल्वे स्थानकाची दुरुस्ती प्रकल्प देण्याच्या बदल्यात लालू प्रसाद यांना एक प्रॉपर्टी मिळाली होती, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 2018 साली सीबीआयने लालू प्रसाद यादव यांची चौकशी सुरु केली होती. पण, 2021 साली हा तपास बंद करण्यात आला. त्यात आता बिहारमध्ये सत्तापालट झाल्याने ही चौकशी सुरु झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षाकडून येत आहे.