हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत ते हिंदू नाहीतच असा थेट आरोप केला आहे. मोदी हिंदू का नाहीत यामागचे कारण सुद्धा लालू प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राजधानी पाटण्यात रविवारी आयोजित जनविश्वास रॅलीत बोलताना लालू यांनी जोरदार भाषण करत उपस्थितांचे लक्ष्य वेधलं. यावेळी राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.
आपल्या भाषणात लालू म्हणाले, हे नरेंद्र मोदी काय आहेत? आजकाल ते घराणेशाहीवर बोलत आहेत. पण तुम्हाला आजपर्यंत मुलं का नाही झाले? असा सवाल लालूप्रसाद यादव यांनी केला. ज्यांना मुले आहेत त्यांना तुम्ही परिवारवादी बोलत आहात, कुटुंबासाठी लढत आहेत असं म्हणता. परंतु तुम्हाला कुटुंबही नाही आणि तुम्ही हिंदू पण नाही. हिंदू धर्मात आईचं किंवा वडिलांचं निधन झालं तर दाढी-मिशा आणि केस काढून क्षौर केलं जातं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातलं काहीही केलं नाही असं उदाहरण यावेळी लालूंनी दिले.
नितीशकुमार पलटूराम –
दरम्यान, लालूंप्रसाद यादव यांनी आपल्या भाषणात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही सडकून टीका केली आहे. 2017 मध्ये जेव्हा नितीश महाआघाडीतून एनडीएमध्ये गेले तेव्हा आम्ही नितीश यांना काहीही वाईट बोललो नाही, फक्त ते पलटूराम आहेत असं म्हंटल. त्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा निसतीशकुमार यांच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांनी दुसऱ्यांदा आपण पलटूराम आहोत हेच दाखवून दिलं आणि नरेंद्र मोदींच्या पायाशी जाऊन बसले. त्यांना पुनः महाआघाडीच्या घेतलं हि आमची चूक झाली अशी कबुलीही लालूंप्रसाद यादव यांनी दिली.