Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटालियन सुपरकार (Lamborghini Huracan Tecnica) निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी इंडियाने आपली हुराकन टेक्निका भारतात लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेत या गाडीची एक्स-शोरूम किंमत 4.04 कोटी रुपये आहे. लॅम्बोर्गिनीची ही जबरदस्त कार आपल्या लूक आणि स्पोर्टी स्टाईलने सर्वानाच हवीहवीशी वाटेल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्सबाबत…

वैशिष्ट्ये – (Lamborghini Huracan Tecnica)

लॅम्बोर्गिनीची Tecnica भारतात उपलब्ध (Lamborghini Huracan Tecnica) असलेल्या सर्व Huracan मॉडेल्सप्रमाणेच दिसते. लाईफस्टाईल आणि ट्रॅक-ओरिएंटेड स्पोर्ट्स कार एरोडायनामिक डिझाइनसह येते आणि ही कार सायन हायब्रीड हायपरकारपासून प्रेरित आहे. या कारच्या बंपरच्या दोन्ही बाजूला Y-आकाराचे इन्सर्ट, एक सुधारित विंडो लाईन, नवीन 20-इंच अलॉय व्हील, कार्बन-फायबर इंजिन कव्हर्स, एक स्थिर मागील स्पॉयलर आणि एक एकीकृत डिफ्यूझर मिळतो.

Lamborghini Huracan Tecnica

325 किमी टॉप स्पीड-

Huracan Tecnica ला (Lamborghini Huracan Tecnica) 5.2-लिटर, नॅचरली एस्पिरेटेड V10 इंजिन देण्यात आलं आहे जे 640 hp पॉवर आणि 565 Nm चे पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारला 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 3.2 सेकंद आणि 200 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी 9.1 सेकंद वेळ लागतो. तसेच, गाडीचे टॉप स्पीड 325 किमी प्रतितास असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही कार रस्ते आणि रेस ट्रॅक दोन्हीसाठी आहे असा दावाही कंपनीने केला आहे.

Lamborghini Huracan Tecnica

 4.04 कोटी किंमत –

Huracan Tecnica चे वजन 1,379 kg आहे. गाडीचे वजन (Lamborghini Huracan Tecnica) हलके करण्यासाठी कारच्या पुढील बोनेट आणि मागील बोनेटमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन फायबर बसविण्यात आले आहे. गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास या Lamborghini कारची किंमत भारताच्या एक्स-शोरूमनुसार 4.04 कोटी आहे.

हे पण वाचा : 

Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

Maruti Suzuki Alto K10 : नवी Alto K10 बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स

Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV

Hyundai Tucson 2022 : Hyundai Tucson मध्ये काय आहे खास; पहा या आलिशान SUV च्या विविध प्रकारांच्या किमती

Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ही 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत