Maruti Suzuki Alto K10 : नवी Alto K10 बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशातील लोकप्रिय (Maruti Suzuki Alto K10) आणि आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपली नवीन अल्टो K10 लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार नवीन डिझाईन आणि शानदार इंटीरियर्ससह लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 24.9 kmpl मायलेज देऊ शकते. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या कारची किंमत आणि फीचर्स याबाबत … .

काय आहेत वैशिष्ट्ये-

मारुती सुझुकीची ही (Maruti Suzuki Alto K10) नवीन अल्टो कंपनीच्या अपडेटेड प्लॅटफॉर्म Heartect वर आधारित आहे. कंपनीने नवीन Alto K10 मध्ये 7-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो व्यतिरिक्त, ही इन्फोटेनमेंट सिस्टम यूएसबी, ब्लूटूथ आणि ऑक्झिलरी केबल्सनाही सपोर्ट करते. नवीन अल्टो मध्ये 15 नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील, ज्यात EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग्ज, सीट बेल्ट प्री टेन्शनर आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या कारला १३ इंचांचे व्हील्स देखील देण्यात आले आहेत. जे या गाडीला चांगला ग्राऊंड क्लीअरन्स देतील. यामुळे ही कार खराब रस्त्यांवर देखील सहजपणे चालवता येईल.

Maruti Suzuki Alto K10

 

गाडीचे इंजिन- (Maruti Suzuki Alto K10)

मारुती सुझुकीच्या या नव्या अल्टो ला 1.0 लीटर K10C थ्री सिलेंडर ड्युअल डेट VVT पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. (Maruti Suzuki Alto K10) हे इंजिन ५५० आरपीएमवर जास्तीत जास्त ६६.६२ पीएस पॉवर जनरेट करू शकते. तसेच 3500 rpm वर 89 Nm टॉर्क जनरेट करू शकते. Alto K10 5- स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियर शिफ्ट ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे.

Maruti Suzuki Alto K10

4 लाख किंमत-

गाडीच्या किमतीबाबत (Maruti Suzuki Alto K10) बोलायच झाल्यास, नवीन मारुती अल्टो K10 ची सुरुवातीची किंमत 3.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 5.83 लाख रुपये असेल कंपनीने ही कार एकूण चार प्रकारात सादर केली आहे. त्यानुसार मारुती अल्टो LXi ची किंमत 4.82 लाख, मारुती अल्टो VXi 5 लाख रुपये आणि VXi + व्हर्जन 5.34 लाख रुपयांना उपलब्ध आहे.

हे पण वाचा : 

Hyundai Tucson 2022 : Hyundai Tucson मध्ये काय आहे खास; पहा या आलिशान SUV च्या विविध प्रकारांच्या किमती

Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Ola सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार; 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार

Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV

Renault Kiger 2022 : नवीन अपडेटसह लॉंच झालेली Renault Kiger बाजारात घालणार धुमाकूळ; पहा फीचर्स आणि किंमत