नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडला क्रिकेटचे माहेरघर मानले जाते. इंग्लंडमध्ये आजही पारंपरिक काऊंटी क्रिकेटला (County Cricket) फार महत्त्व आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार अशी काऊंटी क्रिकेटची (County Cricket) ओळख आहे. काऊंटी क्रिकेट (County Cricket) खेळणे ही आजही खेळाडूंसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी काऊंटी क्रिकेट (County Cricket) खेळलेले आहे त्या लिस्टमध्ये आता भारताचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरचा समावेश होणार आहे. लँकशायर क्रिकेट क्लबने आगामी 50 षटकांच्या चषकासाठी आणि काऊंटी चॅम्पियनशिपसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध करण्याची घोषणा केली आहे.
लँकशायरने आपल्या ट्विटर अकाऊंच्या माध्यमातून सुंदरला करारबद्ध केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. “भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. युनायटेड किंग्डमचा व्हिसा मंजूर झाल्यानंतर वॉशिंग्टन क्लबमध्ये दाखल होईल. साधारण पुढील महिन्यात तो अमिरात ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्याच्या नवीन सहकाऱ्यांना भेटेल,” असे ट्विट लँकशायरकडून करण्यात आले आहे.
✍️ 𝐖𝐚𝐬𝐡𝐢𝐧𝐠𝐭𝐨𝐧 𝐒𝐮𝐧𝐝𝐚𝐫
We're excited to announce the signing of Indian all-rounder @Sundarwashi5 who will play for @lancscricket in the @CountyChamp & @RoyalLondonCup throughout July and August! 🤩
— Lancashire Cricket (@lancscricket) June 22, 2022
मागच्या वर्षी बोटाला दुखापत झाल्यानंतर सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांबच आहे. या दुखापतीमुळे तो गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि 2021 मधील इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यापासून बाहेर आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.
हे पण वाचा :
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नकोय याच वाईट वाटत- उद्धव ठाकरे
‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!
समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान