हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तुम्ही शेतकरी असा किंवा सामान्य नागरिक, जमीन मोजणी (Land Measurement) हि प्रत्येकाच्याच आयुष्यातील न चुकलेली गोष्ट आहे. जमीन मोजणी करायची म्हटल्यावर आजही अनेकांना घाम फुटतो. कारण सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं कि शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं अन पैसे भरणं अनेकांना नको वाटतं. यापार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईलवरून जमीन कशी मोजायची याबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत. तसेच ७/१२ उतारा, भूनकाशा आदी कागदपत्र सोप्प्या पद्धतीने डाउनलोड कारण्याच्याबाबत महत्वाची टेकनिक सांगणार आहोत.
सध्या तंत्रज्ञानाने माणसाची कामे एकदम सोपी केली आहेत. बाजारात अनेक प्रकारचे मोबाईल अँप सध्या उपलब्ध आहेत. मात्र या सर्वामध्ये Hello Krushi नावाचे मोबाईल अँप सर्वाधिक लोकप्रिय बनले आहे. या App चे वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर करून तुम्ही घरी बसून तुमची शेतजमीन १००% बरोबर मोजू शकता. तसेच यामध्ये सातबारा उतारा डाउनलोड करणे, भूनकाशा काढणे आदी सेवाही विनामूल्य दिल्या जातात. रोजचे बाजारभाव, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजनांना अर्ज करणे, हवामान अंदाज आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Hello Krushi हे अँप गुगल प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करायला हवे.
जमिनीची मोजणी मोबाईलवरून कशी करायची?
शेजाऱ्यासोबतचा हद्दीवरुनचा वाद असो वा तुमच्या जमिनीत कंपाऊंड करण्यासाठी तुम्हाला लांबी मोजायची असो Hello Krushi मोबाईल अँप यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. जमिनीची मोजणी करण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा.
१) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करा.
२) यानंतर मोबाईलवर Hello Krushi हे अँप डाउनलोड करून घ्या.
३) आता तुमचे नाव, मोबाईल नंबर, गाव, तालुका आदी माहिती भरून हॅलो कृषीवर मोफत रजिस्ट्रेशन करा.
४) आता हॅलो कृषी अँप ओपन केल्यांनतर तुम्हाला होम स्क्रीनवर बातम्या, सरकारी योजना, जमीन मोजणी, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, पशुपालन, हवामान, सातबारा व भूनकाशा आदी विभाग दिसतील.
५) यामध्ये जमीन मोजण्यासाठी जमीन मोजणी या विभागावर क्लिक करा.
६) आता तुम्हाला उपग्रहावरून दिसणारे तुम्ही उभे असलेले ठिकाण दाखवले. यामध्ये तुमच्या जमिनीच्या हद्दी (कोपरे) निवडा.
७) तुम्हाला तुमची जमीन गुंठ्यात, एकर मध्ये कि भिगा मोजायचीय त्यानुसार सदर पर्यय निवडा.
८) आता तुम्हाला तुमच्या जमिनीच्या हद्दी आणि एकूण क्षेत्रफळ दिसेल.