Land Measurement : आता तुमची शेतजमीन थेट Mobile वरून मोजा; ते सुद्धा अगदी फुकट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Land Measurement । शेतकरी मित्रानो, शेती म्हंटल कि, शेतजमीन आली आणि जमिनीवरून वादही आलेच. तुझी सरी माझ्या हद्दीत आली आणि तुझा बांध माझ्याकडे सरकला अशा अनेक कारणांवरून सक्ख्या शेजाऱ्यांशी वाद होताना आपण ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. अशावेळी सरकारी मोजणी आणायची म्हंटली तर वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होतात. यावरच एक रामबाण उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही एक असं अँप घेऊन आलोय ज्यामधमातून तुम्ही अगदी मोबाईल वरूनच तुमची शेतजमीन नेमकी किती आहे हे मोजू शकता. आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. शेतकऱ्यांसाठी आणलेली ही सुविधा म्हणजे Hello Krushi हे मोबाईल अँप

शेती करत असताना शेतकऱ्यांचे जीवनमान सोप्प व्हावं, त्याच काम हलकं व्हावं आणि शेतकऱ्याला कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन Hello Krushi अँप तयार करण्यात आलं आहे. या अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेतजमीन, कोणतेही मैदान किंवा कंपाऊंडची मोजणी अगदी फुकट मध्ये आणि फक्त काही मिनिटात मोजू शकता. तसेच या सुविधेमुळे जर तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार करत असल्यास तर जमिनीच्या लांबी-रुंदी नुसार नेमकी किती रोपे लावावी याचा अंदाज सुद्धा बांधू शकता. मग उशीर कसला करताय? चला…

Hello Krushi अँप वरून शेतजमीन कशी मोजायचे हे अगदी सोप्प्या भाषेत समजून घेऊया. (Land Measurement)

1) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link :https://bit.ly/HelloKrushiApp

2) मोबाईल हॅलो कृषी हे अँप Install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती टाका .

3) अँप ओपन करताच तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी (Land Measurement) या विभागावर क्लिक करा

4) क्लीक करताच आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.

5 ) आता तुमची शेतजमीन नेमकी किती भरतोय हे पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा. ( हेक्तर, एकर चौरस मीटर, चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.

6 ) आता तुम्हांला जी शेतजमीन, किंवा कंपाउंड, जे काही मोजायचे असेल त्याचे एक – एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.

7 ) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.

8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याचा अचूक आकडा तुम्हाला दिसेल.

शेतकरी मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त शेतजमिनच मोजता येत नाही तर शेतीशी निगडित सर्व सोयी – सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव समजतो, तुम्ही फुकट मध्ये तुमच्या जमीनच सातबारा उतारा काढू शकताय. सलग ४ दिवसांचा हवामान अंदाज तुम्हाला समजतोय, येव्हडच नव्हे तर सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या सर्व शासकीय योजनांना एका क्लीक वर अर्ज पण तुम्ही करू शकताय. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. हॅलो कृषीमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा मिळतात त्या आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगतो.

हॅलो कृषीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधा

1) हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतीविषयक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील.

2) सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे समजतोय .

3) राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव एका क्लीकवर दिसतोय.

4) शेतकऱ्यांशी संबंधित सर्व शासकीय योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करता येतो आणि त्याचा आर्थिक लाभ घेता येतो.

5) हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भू- नकाशा काढता येतो.

6 ) आपली शेतजमीन अगदी 2 मिनिटात मोजता येते.

7) तुमच्या आसपासच्या परिसरातील सर्व रोपवाटिका, कृषी केंद्र, खत दुकानदार यांच्याशी थेट संपर्क साधता येतोय.

8) शेतीशी निगडित जुनी अवजारे , पशूंची खरेदी- विक्री , तसेच शेतजमीन यांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.

9) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो