Land Record : सातबारा उतारा मिळतोय फुकटमध्ये; तलाठ्याकडे हेलपाटे आणि पैसेही वाचणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Land Record)। शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना सातबारा उताऱ्याचे महत्व आपल्याला माहीतच आहे. शेती संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा म्हंटल तर सर्वात आधी तुमचा सातबारा उतारा मागितला जातो. तुमच्या नावावर किती जमीन आहे हे तुमच्या सातबाऱ्यावरून कळत. त्यामुळे सातबारा उतारा काढायचं म्हंटल तर गावातील तलाठी किंवा अन्य कृषी केंद्राकडे जावं लागत. यामुळे तुमचा वेळही जातो आणि पैसे खर्च होतात. अशावेळी आज आम्ही तुमच्यासाठी असं एक अँप घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या आणि अगदी फुकट मध्ये तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा काढू शकता. यासाठी तुमचा जास्त वेळही जाणार नाही. तुम्ही अगदी काही मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण करू शकताय, चला तर मग उशीर कसला करताय? सरळ जाणूनच घेऊया ना…

फक्त ७/१२ नाही तर जमीन मोजणी अन बाजारभाव पाहण्याचीही सुविधा

शेतकरी मित्रांनो या अँपच नाव आहे Hello Krushi. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी असलेल्या या अँपवर तुम्ही तुमचा सातबारा उतारा, डिजिटर सातबारा, जमिनीचा नकाशा आदी बाबी अगदी सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करू शकता. शिवाय तुम्ही हॅलो कृषी अँपवरून तुमची जमीनही मोजू शकता. तसेच कोणत्याही शासकीय योजनेला घरी बसून सहज अर्ज करून शासकीय अनुदान मिळवू शकता. रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज अन जमीन खरेदी विक्रीसुद्धा या अँपवरून करता येते. तेव्हा लगेचंच मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा अन आजच तुमच्या फायद्याचं हे अँप डाउनलोड करून घ्या.

खास शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन आणि त्याचं काम हलकं कस होईल हेच ध्येय समोर ठेऊन आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi हे अँप घेऊन आलो आहोत. Hello Krushi या मोबाईल अँप वर 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही सातबारा उतारा काढू शकताय. हा उतारा (Land Record) काढण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा उतारा काढू शकताय. यासाठी आम्ही खाली ज्या स्टेप्स दिल्या आहेत त्या फक्त फॉलो करा.

1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर यामध्ये सर्वात आधी तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

3) आता होम पेज वर जाऊन ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

4) यामध्ये तुम्हाला सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई-चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. असे 6 विभाग दिसतील. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.

5) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा पुणे , नाशिक, नागपूर )

6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. सातारा गोंदिया , अहमदनगर .. )

7) आता तालुका निवडा (उदा. कराड ,जामखेड , देवरी ..)

8)गाव निवडा (उदा. काले , काटेवाडी , आमगाव )

9) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.

10) त्यानंतर गट नंबर हा पर्याय निवडा, ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा. (येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव, मधले नाव, सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)

11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.

12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी स्वतःच तुमचा captcha भरेल.

13) आता तुम्हाला तुमचा सातबारा उतारा दिसेल. त्यानंतर ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत? (Land Record)

1) Hello Krushi अँप वर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.

2) तुम्ही कोणतीही शेतजमीन 1 रुपया सुद्धा खर्च न करता अगदी फुकटात मोजू शकता

3) सातबारा उतारा, भू- नकाशा काढून मिळतो.

4) सलग 4 दिवसांचा अचूक हवामान अंदाज कळतोय.

5) राज्यातील सर्व बाजार समितीतील पिकांचा रोजचा बाजारभाव कळेल.

6) तुमच्या जवळच्या रोपवाटिका, खत दुकानदार, यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.

7) तुमच्याकडे असलेली जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय थेट खरेदी विक्री करता येते.

8) म्हैस – गाई कुत्रा यांसारख्या जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येत असल्यामुळे एजंटला जाणारा पैसा वाचतो.

9) महत्तवाचे म्हणजे शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.

शेतकरी मित्रानो, शेती करताना बळीराजाला येणाऱ्या अडचणींवर मात करून त्याचे काम सोप्प कस करता येईल हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन हॅलो कृषी हे अँप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. यातील सर्व सोयी सुविधेचा लाभ घेण्यासाठी हॅलो कृषी शेतकऱ्यांकडून 1 रुपयासुद्धा घेत नाही. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि सर्व सुविधेचा लाभ घ्या.