व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी केलेल्या तक्रारीचे दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नेहा देसाई खालापूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवली आहे. अद्याप या 5 जणांची नावे समोर आली नसली तरी यामध्ये इ सी एल फायनान्स कंपनी आणि एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हणले जात आहे.

नेहा देसाई यांनी केलेल्या तक्रारीनंतर खालापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाई यांच्या मागे कर्ज प्रकरणात वारंवार तगादार लावून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलिसांनी कलम ३०६, ३४ अन्वये अंतर्गत या गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे लवकरच आता याप्रकरणी पाचही जणांना अटक केली जाऊ शकते.

नितीन देसाई यांच्यावर कर्ज असल्यामुळे इ सी एल फायनान्स कंपनी आणि एडेलवाईस ग्रुपच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना सतत मानसिक त्रास दिला जात होता. या मानसिक त्रासाला कंटाळून असा देसाईंनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मुख्य म्हणजे, आत्महत्येपूर्वी देसाई यांनी 10 ते 11 क्लिप्समध्ये आपले व्हॉईस रेकॉर्डिंग केले होते. यामधून देखील कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिकारी त्रास दिल्याचे उघडली झाले आहे.

दरम्यान आज एसडी स्टुडिओत नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी पार पडला. जे जे रुग्णालयातून नितीन देसाई यांचे पार्थिव थेट स्टुडिओ दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठी आणि हिंदी कलाकारांनी आपली उपस्थिती नोंदवली . नितीन देसाई यांच्या जाणाऱ्या संपूर्ण कला विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीन देसाई यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण कला विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.