भाडेकरूच्या Start-Up मध्ये घरमालकाने गुंतवले 10,000 डॉलर

shri gupta start up
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या IT क्षेत्राच्या उभारणीत बेंगलोरचे नाव हे अग्रक्रमाने घेतलं आहे. देशातील अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या बेंगलोर मध्ये आहेत. त्यामुळे नोकरीसाठी देशभरातील तरुण बेंगलोरची वाट धरतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून अनेक टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत असलयाने घरमालक भाडेकरूंबद्दल चिंतेत आहेत. त्यामुळे घरमालकाच्या मागण्यांचा सामना करणं खरं तर टेक कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे. अनेकदा तर आपण सोशल मीडियावर असेही पाहिले आहे की घरमालकांनी भाडेकरूंकडून त्यांचे लिंक्डइन प्रोफाइल, बोर्ड मार्क्स आणि अगदी IIT आणि IIM पदवीची मागणी केली आहे. बहुतेक घरमालकांचे वर्तन हे त्यांचे कठोर निकष दाखवतात की देशाच्या प्रमुख संस्थेतून पदवीधर झालेला कर्मचारी हा भाडेकरू म्हणून ‘योग्य’ असू शकतो का? एकीकडे हे सगळं सुरु असताना पवन गुप्ताने अलीकडेच त्याच्या घरमालकाकडून त्याच्या स्टार्टअप – BetterHalf साठी १० हजार डॉलर जमा केल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे अनेक स्टार्टअपना आशेचा एक नवा किरण सापडला आहे.

गुप्ता यांनी याबाबत आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे जी अगदी कमी वेळेतच वाऱ्यासारखी पसरली. घरमालकाने अविवाहितांसाठी AI द्वारे चालवलेल्या पहिल्या विवाह सुपर अॅपमध्ये $10,000 ची गुंतवणूक केली आहे. या व्हायरल चॅटमध्ये घरमालक लिहितो, ‘प्रामाणिकपणे मी तुमच्या स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक करत आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आणि आशा आहे की तुम्ही सर्वोच्च उंचीवर पोहोचाल. त्यानंतर घरमालकाला उत्तर देताना श्री गुप्ता यांनी धन्यवाद सुशील असं उत्तर दिले.

श्री गुप्ता यांनी या ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हंटल की, “कठीण व्यवसायाच्या परिस्थितीत, मला माझ्या घरमालकामध्ये एक अनपेक्षित गुंतवणूकदार सापडला. त्यांनी अलीकडेच माझ्या स्टार्टअप @betterhalfai मध्ये १० हजार डॉलरची गुंतवणूक केली. खरोखरच बंगलोरमधील प्रत्येकजण उद्योजकतेच्या भावनेने थक्क झाला आहे. म्हणूनच या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात ते हेच कारण आहे. गुप्ता यांच्या ट्विटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेकांनी काही कमेंट्स केल्या आहेत.