भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नेपाळमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून नाले, नदी दुथडी भरून वाहत आहेत. याच दरम्यान, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. मदन-आश्रित महामार्गावर हि दरड कोसळून भूस्सखलन झालं आणि यामध्ये दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस चालक आणि कंडक्टरसह एकूण 63 जण प्रवास करत होते. बचावकार्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.

चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बसेस महामार्गावरून जात असताना भूस्खलनाने त्या नदीत गेल्या. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस चालक आणि कंडक्टरसह एकूण 63 जण प्रवास करत होते. बचावकार्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध आणि सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.