अलिबाग प्रतिनिधी । मकर संक्रांतीच्या दिवसांत पतंगाच्या मांजाने अनेकदा वन्यजीवांना इजा पोहोचल्याचे प्रकार घडत असतात. अशीच घटना अलिबाग येथील नागाव येथे घडल्याचे समोर आले आहे. मात्र वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. डॉक्टर दिपा कटियाल यांच्या प्राणी ईस्पीतळात जखमी माकडावर उपचार करण्यात आले. डाॅ दीपा यांनी माकडास कृत्रिम श्वासोश्वास देऊन नवजीवन दिले.
हाती आलेल्या माहिती नुसार, वनाधिकारी तायडे व वनरक्षक अशोक गोरे कामावर असताना त्यांना नागाव येथे लंगुर प्रजातीचे माकड गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. माकडास तात्काळ डॉक्टर दिपा कट्याल यांच्या प्राणी ईस्पीतळात उपचार साठी नेले. उपचार सुरू असताना लंगूर जातीच्या माकडाचे रक्तदाब कमी झाल्याने त्याचे ह्रदय बंद पडले. त्या वेळी डाॅ दिपा यांनी माकडास कृत्रिम श्वासोश्वास देऊन नवजीवन दिले.
“संक्रांति दरम्यान पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या पशु पक्षांवर उपचार करण्यासाठी आम्ही फिरत असताना आम्हाला अनेकवेळा प्राणी भयानकरित्या जखमी अवस्थेत सापडले आहेत. या संकांतीला वन अधिकारी मौलेश तायडे आणि त्यांचे सहकारी यांना नागाव गावात लंगुर प्रजातीचे माकड गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ त्यास दवाखान्यात आणल्यानेक त्याचे प्राण वाचले” असे मत डॉक्टर कटियाल यांनी व्यक्त केले.
नागाव अलिबाग येथे लंगूर प्रजाती चे माकड, वनरक्षक श्री तायडे यांना जखमी अवस्थेत मिळाले. त्यावर श्रीमती दिपा कटियाल यांच्या प्राणी ईस्पीतळात उपचार सुरू असताना त्याचे ब्लड प्रेशर कमी झाले व ह्रदय बंद पडले . त्या वेळी डाॅ दिपा यांनी माकडास कृत्रिम श्वासोश्वास देऊन नवजीवन दिले pic.twitter.com/wCaEnNo1m0
— MahaForest (@MahaForest) January 18, 2019