हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या पोषण आहारात आळ्या आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. या घटनेनंतर लाभार्थी नागरिक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सरकार मुलांच्या जीवाशी खेळ करत आहेत का? असा सवालही पालकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. ज्या पाकिटातून हे धान्य वाटप करण्यात आले आहे. त्यावर शासनाचा अधिकाऱ्यांचा शिका सुद्धा दिसत आहे. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकारीने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला.
पुण्यातल्या जनता वसाहतमधील पान आळीमध्ये हा सर्व प्रकार घडला. संबंधित महिलेने हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतल्यानंतर त्यामध्ये अळी आढळली आणि निरखून पाहायला नंतर त्यामध्ये उंदराची विष्ठा आढळून आली. संबंधित महिलेने संताप व्यक्त करत तक्रार दिली आणि पोषण आहार मिळलेल्या लाभार्थींना पण सतर्क करण्यात आले आहे. सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे का ? असा प्रश्न आता संबंधित नागरिक विचारत आहे