नवी दिल्ली । देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे ५२१२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १५,८३,७९२ वर जाऊन पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ३४,९६८ इतका झाला आहे. सध्याच्या घडीला देशात एकूण ५,२८,२४२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशातील १०,२०,५८२ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
देशात पहिल्यांदाच २४ तासांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सध्या देशभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब नसली तरी कोरोनाचा मृत्यूदर आटोक्यात ठेवणे, ही देशातील आरोग्य यंत्रणांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,२१९ने वाढली आहे. तर २९८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४ लाखांच्या वरती गेला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४,००,६५१ एवढी झाली आहे. यापैकी १,४६,१२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजच्या एका दिवसात ७,४७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यातले २,३९,७५५ रुग्ण बरे झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”