मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर त्याचे चाहते अजूनही सावरलेले नाही आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्याला एकदा पुन्हा मोठ्या पद्यावर पाहण्याची इच्छा मनात बाळगून सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेला ‘दिल बेचारा’ चित्रपटगृहातच प्रदर्शित केला जावा अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.
‘दिल बेचारा’चं पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी असल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आलं होतं. सध्या चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जाण्याची हवा आहे. पण, हा चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. २०१४ साली आलेल्या हॉलिवूडच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार’ या चित्रपटाचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’ ही एक प्रेमकथा असून, त्यात संजना संघी त्याची नायिका आहे. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधली घराणेशाही, नवोदित कलाकारांना न दिली जाणारी संधी यावरुन वाद उफाळून आला. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीमुळं त्याच्यावर ही वेळ आली असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपच मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करण्यात यावा, ‘आम्हाला आमच्या हिरोला शेवटंचं मोठ्या पडद्यावर पाहयचं आहे’, असं सुशांतच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. ८ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउमुळं हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”