नवी दिल्ली | लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज मंगळवारी पदभार स्वीकारला. नरवणे यांच्या रूपाने मराठी व्यक्ती लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाली असून, नरवणे देशाचे २८वे लष्करप्रमुख ठरले आहेत. दरम्यान, जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारने संरक्षण प्रमुखपदी निवड केली असून, ते आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झालेत.
नरवणे यांची नियुक्ती हा देशाप्रमाणेच महाराष्ट्रासाठीही अभिमानास्पद क्षण आहे. नरवणे यांना ३७ वर्षांचा अनुभव असून, नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. आज ते देशाचे लष्करप्रमुख झालेत.
#WATCH General Manoj Mukund Naravane takes over as the 28th Chief of Army Staff, succeeding General Bipin Rawat. pic.twitter.com/oQtwPU9wAo
— ANI (@ANI) December 31, 2019
मनोज नरवणे यांनी सुरूवातीचे शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून घेतले. चित्रकलेची त्यांना आवड आहे, हे विशेष. पुण्यातील एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत त्यांनी पुढील प्रशिक्षण घेतले. लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी ‘आसाम रायफल्स’चे महानिरीक्षक, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे.
हे पण वाचा –
मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र सत्तेचा रिमोट शरद पवारांच्याच हातात
शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?
हे जनतेचे नव्हे, पिता पुत्राचे सरकार – सुधीर मुनगंटीवार
वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले