मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुक निकाल लागून आता एक आठवडा उलटला आहे, मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे अजूनही सत्तावाटपाचा प्रश्न सुटला नसून भाजप कुठेही नरमाईच्या भूमिकेत दिसत नसल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला एका शायरीद्वारे जोरदार टोला लगावला आहे.
“साहिब…मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए…” असे ट्वीट करत राऊत यांनी भाजपा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. भाजपला राज्यातील जनतेने महाजनादेश दिला नसून नुसता जनादेश दिला आहे. त्यामुळे आपण सत्य स्विकारले पाहिजे, नाहीतर अहंकाराच्या सागरात अनेक मोठी मोठी माणसे बुडाली आहेत, असा संदेश राऊत यांनी दिला आहे.
कालच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. सत्तेमधील पद व जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होईल असे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री यांनी युती बाबत भूमिका व्यक्त केली होती. त्यामुळे जे आधीच ठरले होते त्या प्रमाणेच होईल.
*साहिब…*
*मत पालिए, अहंकार को इतना,*
*वक़्त के सागर में कईं,*
*सिकन्दर डूब गए..!*— Sanjay Raut (@rautsanjay61) November 1, 2019