सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
साताऱ्यात निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असून सत्ताधाऱ्यांचा सांगण्यावरुन खोट्या कारवाया केल्या जात आहेत. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यापासून सर्वच प्रशासकीय अधिकारी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. अधिकाऱ्यांना खोट्या कारवाई करण्याबाबत सत्ताधारी सरकार सूचना करत असून याबाबत अधिकाऱ्यांच्या भेटी घेवुन सुद्धा यामध्ये बदल झाला नाही. यामुळं हा आज लाठी मोर्चा काढण्यात आला असल्याचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिदे यांनी सांगितले.
प्रशासकीय यंत्रणा व सरकार यांच्या विरोधात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बाँम्बे रेस्टोरंन्ट ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर लाठी मोर्चा काढुन निदर्शने केली. साताऱ्यातील अधिकाऱ्यांकडून न्याय भुमिका न घेता एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. या मोर्चात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचा मोठा दबाव या अधिकाऱ्यांवर असून या दबावामुळंच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनियमीत कामं करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा शशिकांत शिंदे यांनी केला आहे. तसंच इतर पक्षातील कार्यकर्ता सत्ताधारी पक्षात यावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या मार्फतच दबाव टाकण्याचा गंभीर घडत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.