हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Lavasa City । पावसाळा म्हंटल कि कुठंतरी पर्यटनाला जाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही.. खास करून हिल स्टेशन, धबधबे अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. तुम्हीही पावसाळ्याच्या पर्यटन करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका अनोख्या हिल स्टेशन बाबत सांगणार आहोत ज्याठिकाणी जाताच तुम्हाला वाटेल कि आपण जणू युरोप मध्येच आलोय. तुम्हाला याठिकाणी इटलीत आल्यासारखाच फील होईल.. दोन्ही बाजूला सेम इटली सारखी घरे.. आणि मध्ये पाण्याचा कालवा… ओळखलंत ना? बरोब्बर आम्ही बोलतोय लवासा बद्दल… पुण्याच्या शेजारी असलेल्या या प्रसिद्ध सिटी बद्दल…

फोटोग्राफी प्रेमींसाठी लवासा म्हणजे जणू स्वर्गच- Lavasa City
लवासा (Lavasa City) हे पुणे जवळील खासगी hill city आहे, ज्याला “युरोपियन टच” दिलेला आहे. पुण्यापासून 65 किमी आणि मुंबईपासून 195 किमी अंतरावर Warasgaon Lake च्या परिसरात व सात डोंगरांच्या घेरात हे शहर वसलेले आहे. लवासाचे संपूर्ण नियोजन तेलग्रामातील पोर्टोफिनो या इटालियन शहरावरून प्रेरित आहे.

फोटोग्राफीसाठी परफेक्ट स्पॉट म्हणूनही याची ओळख आहे. लवासाचे डिझाईन इतकं सुंदर केलं आहे की ते पाहताना तुम्हाला इटलीतल्या एखाद्या छोट्याशा शहराची आठवण येईल. स्वच्छ वातावरण, उच्च दर्जाची हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, मनोरंजन पार्क आणि इतर सुविधांमुळे ते तुम्हाला दुसऱ्या देशात असल्याचे फील मिळेल. फोटोग्राफी प्रेमींसाठी लवासा म्हणजे जणू स्वर्गच आहे. याठिकाणी असलेल्या रंगीबेरंगी इमारती, तलावाचं सौंदर्य, आणि प्रत्येक कोपर्यावर असलेली वॉल आर्ट तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल.

लवासा मध्ये (Lavasa City) तुम्ही लेकसाईड प्रोमेनेड, टेमघर धरण, दासवे दृष्टिकोन, बांबूसा, तिकोना किल्ला, देवकुंड धबधबा, वरसगाव धरण याठिकाणी पर्यटन करू शकता.
लवासामध्ये असलेला घाणागड किल्ला ताम्हिणी घाटाजवळ आहे. मध्ययुगीन काळात बांधलेल्या या किल्ल्यानं एकेकाळी मराठे, पेशवे आणि इंग्रज यांच्यातील अनेक युद्धे पाहिली आहेत हा किल्ला त्या युद्धाचा साक्षी आहे.
मुठा नदीवर वसलेले टेमघर धरण हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे तसेच एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. आजूबाजूची हिरवळ आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. लवासा मध्ये तुम्ही बोटिंग, जेट स्कीइंग, क्रूझ राईड्स, ट्रेकिंग, सायकलिंग अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता.




