उस्मानाबाद प्रतिनिधी । उस्मानाबादमधील तेरमधल्या रामलिंगप्पा लामतुरे पुराततत्व वस्तुसंग्रालय हे पुराणवस्तू संशोधकांना, इतिहासकारांना आणि अभ्यासकांना परिचित असलेले ठिकाण आहे. या संग्रालयातील वस्तू शासनाच्या वस्तुसंग्रलयाला देऊन लामतुरे वस्तुसंग्रालयाचं नाव जगप्रसिद्ध झालं आहे.
रामलिंगाप्पा लामतुरे आणि त्यांचे चिरंजीव भागवतप्पा यांनी या वस्तुसंग्रलयाचं संवर्धन केलं आहे. भारतातील हस्तिदंताची कारागिरी १९७० च्या दशकात प्रसिद्ध होती. मध्यप्रदेशातील विदिशा येथील हस्तिदंतांचे कारागीरही प्रसिद्ध होते. भारतातून रोमन साम्राज्यात निर्यात केल्या जाणाऱ्या या मूर्तीची तेव्हापासून बरीचचर्चा आहे. अशाच प्रकारे इटलीतील पॉम्पे इथं सापडलेली हस्तिदंताची मूर्ती लक्ष्मीची आहे, असं समजलं जातं. हस्तिदंताची ही मूर्ती आता संपूर्ण उस्मानाबादमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या नयनरम्य मूर्तीची चर्चा आता राज्यासह देशातील पर्यटकांमध्ये सुरु आहे.
साडे बारा सेंटीमीटर उंचीच्या मूर्तीचे पाय हे तुटलेले असून चेहरा गुबगुबीत आणि डोळे मोठे आहेत. कपाळावर बिंदी,कानात नक्षीदार डूल, दंडावर अलंकार असं एकूण या मूर्तीच रूप लोभसवाणं आहे. मूर्तीच्या अंगावरील अलंकारांची रचनाही लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असून हि मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून नागरिक गर्दी करत आहेत. हस्तिदंतापासून बनवलेल्या स्त्रीप्रतिमा या संग्रहालयाची शोभा वाढवत असून या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते आणि इतर मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.