हाॅटेल राजयोग आणि एका अवैद्य दारू विकणाऱ्यावर एलसीबीची कारवाई

Daru Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून भुईंज परिसरात गुपचूप दारू विक्री करणार्‍या दोन ठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. भुईंजच्या हाॅटेल राजयोग परमिट रूम बिअर बारमध्ये वेळेचे बंधन झुगारून आणि विरमाडे येथे अवैद्य देशी- विदेशी दारूची चोरटी दारू विकत होते.

याबाबत माहिती अशी, यावेळी हॉटेल राजयोग परमीट रूम, बिअर बार येथे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री करीत असताना दिसून आले. या हॉटेलवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विरमाडे (ता. वाई) गावच्या हद्दीत किशोर शिवाजी सोनावणे यांच्या राहत्या घराच्या आडोशाला देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण 5 हजार 760 रुपयांचा माल मिळून आल्याने त्यांच्यावर भुईज पोलीस ठाण्यात साथीचे रोग अधिनियम व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, पो.हवा. विजय कांबळे, पो.ना. शरद बेबले, रविंद्र वाघमारे, प्रवीण कांबळे यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group