सातारा | बामतीदारामार्फत बातमी मिळाली की, संगमनगर परिसरात एकजण संशयितरित्या फिरत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून स्थानिक गुन्हा शाखेने शिताफिने संशयितास ताब्यात घेतले. या संशयिताने 4 ठिकाणी घरफोडी व एका ठिकाणी चंदनचोरी केल्याचे चाैकशीत समोर आले आहे. या प्रकरणात रोहित ऊर्फ फैज्या पितांबर शिंदे (वय 20 रा. खेड- सातारा, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका बातमीदाराने एकजण संशयित फिरत असल्याची माहिती दिली होती. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता प्रथम त्याने पोलीस पथकाची दिशाभूल करून कोणतीही उपयुक्त माहिती दिली नाही. परंतु त्यास विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सातारा शहर येथील प्रताप कॉलनी देगाव फाटा, फलटण येथील निंभोरे व साखरवाडी तसेच पुणे जिल्हयातील इंदापूर येथील अधिकानगर येथे घरफोडया केल्याचे सांगितले. तसेच सातारा येथील ओतारी कोल्ड स्टोरेज कंपनी येथून चंदनाचे झाड चोरी केले असले बाबत कबूली दिली आहे.
संशयिताने पोलिसांना दिलेल्या महितीचे अनुषंगाने अभिलेख तपासला असता गुन्हे दाखल झालेले होते. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, सातारा अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे अधिपत्याखाली तानाजी माने, पोह सुधिर बनकर, मोहन नाचण, संतोष सपकाळ, संतोष पवार, राजकुगार ननावरे, अर्जुन शिरतोड़े, गणेश कापरे, शिवाजी भिसे, प्रविण पवार, केतन शिंदे, धिरज महाडीक, मोहसिन मोमीन, संकेत निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, चालक विजय सावंत यांनी सहभाग घेतला होता.