साताऱ्यातील घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील मध्यवर्ती भागात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या चोरट्याच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल 11 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. शशिकांत उर्फ अनंत माने (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील समर्थनगर परिसरातील निशिगंधा कॉलनीतील निर्मिती हाईट्स या अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी एक घडफोडीची घटना घडली होती. याबाबत अपार्टमेंटमध्ये घरफोडी झालेल्या संबंधिताने पोलिसात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात होता. सातारा स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी सातार्यात ठिकठिकाणा तपास केल्यानंतर त्यांनी घरफोडीचे गुन्हा उघडकीस आणले असून बिल्डर शशिकांत उर्फ अनंत माने (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

शशिकांत यांच्याकडे चौकशी केली असता त्याने समर्थनगर परिसराबरोबर इतर तीन ठिकाणी घरफोडी केल्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 11 लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.